मालेगाव, दि. ९- ह्यशुद्ध पेयजलह्णच्या नावाखाली अशुद्ध पाणी व बोअरवेलचे पाणी थंड करून कॅनद्वारे विकण्याचा गोरखधंदा मालेगाव शहरासह तालुक्यात सुरू असल्याची बाब ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने सोमवारी उघडकीस आणली.पिण्यासाठी वापर होणार्या पाण्याची विक्री करण्यापूर्वी त्याच्या शुद्धतेची तपासणी होणे आवश्यक आहे. मालेगाव शहरासह तालुक्यात पाणी विक्रीचा व्यवसाय अनेकांनी थाटला आहे. कॅनद्वारे १५ किंवा २0 लीटर पाणी थंड करून विकणारे २0 पेक्षा जास्त प्रकल्प आहेत. विहिरीला, बोअरवेलला पक्के पाणी लागले की छोटे शेड बांधून थंड पाणी करणारे यंत्र बसवून ते थंड पाणी शुद्ध पाणी म्हणून कॅनमध्ये टाकले जाते आणि २५ ते ३0 रुपयाला एक याप्रमाणे विक्री सुरू आहे.रविवार व सोमवारी पाहणी केली असता, बहुतांश प्रकल्पामध्ये पाणी शुद्ध केल्या जात नाही. फक्त थंड करून पाणी विक्री केल्या जाते, असेही आढळून आले. काही कॅनमधील पाण्याला तर रॉकेलचा वास येतो. अशुद्ध पाणी विक्रीपासून पैसे कमविण्याचा गोरखधंदा तालुक्यात सुरू आहे. अशुद्ध पाणी विकणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे.
‘शुद्ध जल’च्या नावाखाली लूट!
By admin | Published: January 10, 2017 2:36 AM