लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एका सोने व्यापाºयाची सोने चांदीचे दागिने व रोख रकमेने भरलेली पिशवी तोतया पोलीसांनी लुटल्याचा प्रकार १९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताचे सुमारास शिवाजी चौक परिसरात घडला. पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार मुंबई येथील संगम आॅरगॅनेट मध्ये सोन्याचा व्यापार करणारा कर्मचारी गनाराम प्रल्हादराव राठोड (रा. तापडीया नगर, हिंगोली) हा वाशिम येथे व्यापारानिमित्त आला होता. त्याचेजवळील पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व रोख २५ हजार असा एकुण ७ लाख ९० हजाराचा ऐवज होता. शिवाजी चौक परिसरात अज्ञात दोन इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून आम्हाला तुमची बॅग तपासायची आहे. तुमच्या बॅग मधे ड्रग असल्याची आम्हाला माहिती मिळाली. असे म्हणुन राठोड यांचे जवळ असलेली बॅग तपासाताना या दोन्ही तोतया पोलीसांनी हातचलाखी करून बॅगमधील सर्व सोन्याचे दागिने व रोख २५ हजार रूपये लंपास केले. या घटनेची राठोड यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला.
तोतया पोलीसांनी सोने व्यापा-याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 7:24 PM
वाशिम : एका सोने व्यापा-याची सोने चांदीचे दागिने व रोख रकमेने भरलेली पिशवी तोतया पोलीसांनी लुटल्याचा प्रकार १९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताचे सुमारास शिवाजी चौक परिसरात घडला. पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्दे७.९० लाखाचा ऐवज लंपास शिवाजी चौकातील घटना