वाळू घाटांचे लिलाव झाल्याने लोणी-रिसोड या राज्य मार्गावर अनेक ठिकाणी अवैध वीटभट्ट्या सुरू करण्यात आल्या आहेत. एक लाख विटांची भट्टी लावण्यासाठी शेकडो ब्रास लाल माती लागते. ही लाल माती वनविभाग किंवा शासनाच्या ई-क्लास जमिनीवरून दिवसाढवळ्या उचलली जाते. या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. महसूल विभागाला गुंगारा देण्यामध्ये अवैध वीटभट्टीधारक माहीर असल्याने एखाद्या शेतकऱ्यांशी परस्पर सेटमेंट करून फक्त दिखावा म्हणून लालमातीकरिता शेत घेतात. परंतु घेतलेल्या जमिनीऐवजी शासनाच्या ई-क्लास जमिनीवरील ट्रॅक्टरद्वारे हजारो ब्रास लालमाती उचलून ई-क्लास जमिनीचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे या वीटभट्ट्यांवरील लालमातीची तपासणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि पशुपालकांद्वारे होत आहे. अवैध वीटभट्टीधारकांकडून वैधरित्या जमा करण्यात आलेल्या लाल माती संदर्भात काही तलाठ्यांना विचारणा केली असता. वीटभट्टीधारक काही प्रमाणात महसूल देतात. परंतु जादा लाल माती जमा केल्याची माहिती नाही. त्यामुळे वीटभट्ट्यांची तपासणी केल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.
वीटभट्टीधारकांकडून ई-क्लास जमिनीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:43 AM