गत पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात गव्हाची पेरणी केली, तर ज्या शेतकरी वर्गाकडे पाण्याची तोकडी व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यानी गहू पिकाऐवजी हरभरा पिकाच्या पेरणीला पसंती दिली. त्यामुळे उंबर्डा बाजारसह परिसरात हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात सुरुवातीच्या पोषक वातावरणामुळे हरभऱ्याचे पीक चांगलेच बहरले असून, सद्य:स्थितीत हे पीक घाटे धारणेच्या अवस्थेत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकाचे घाटे परिपक्व अवस्थेत आहेत. तथापि, हे शिवार कारंजा सोहळ काळवीट अभयारण्यालगत असल्याने मात्र शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे. गेल्या आठवडाभरापासून माकडांचे कळप शिवारातील हरभरा पिकाचे घाटे फस्त करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. त्यातच ही माकडे नियंत्रणाबाहेर असल्याने शेतकरी हताश झाला असून, माकडांसह इतर वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री थंडीत कुडकुडत शेतात जागरण करावे लागत आहे.
===Photopath===
070121\07wsm_6_07012021_35.jpg
===Caption===
माकडांच्या कळपाकडून हरभरा पिकाचे नुकसान