नेतंसा : येथील परिसरात ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वेळात अवकाळी गारपीट झाली. या अवकाळी गारपीट मध्ये स्थानिक परिसरातील हरभरा, गहू व फळबाग क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. सदर नुकसानीची पाहणी करण्यासाठी विभागाचे आमदार अमितभाऊ झनक यांनी तातडीने कृषी विभागातील अधिकायार्ना बोलाऊन नुकसान ग्रस्त क्षेत्राची पाहणी ८.३० ते ११ वाजेपर्यंत केली . यावेळी रिसोडचे तहसीलदार सुरडकर साहेब, उपसभापती महादेवराव ठाकरे, बबनराव पाटील, डॉ. संतोष बाजड तालुका कृषी अधिकारी तांबिले साहेब तसेच सामंधित विभागाचे सर्व अधिकारी तसेच सोबत गावाचे सरपंच लक्षमण बाजड ,पोलीस पाटील किशोर पाटील, उपसरपंच दिलीप बाजड, नारायण बाजड, भास्कर पाटील, अर्जुनराव बाजड, रुपराव बाजड, खुशाल बाजड, संजय बाजड, पपू पाटील यांच्यासह गावातील बहुसंख्य नुकासन ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
नेतन्सा येथे हरभरा, गहू व फळबाग क्षेत्राचे नुकसान; आमदार झनकांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:33 PM
नेतंसा : येथील परिसरात ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वेळात अवकाळी गारपीट झाली.
ठळक मुद्देगारपीट मध्ये स्थानिक परिसरातील हरभरा, गहू व फळबाग क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. आमदार अमितभाऊ झनक यांनी तातडीने कृषी विभागातील अधिकायार्ना बोलाऊन नुकसान ग्रस्त क्षेत्राची पाहणी ८.३० ते ११ वाजेपर्यंत केली .