भर जहागीर परिसरातील बहुतांश गावातील शेतकरी वर्गाने उन्हाळी भुईमूग पेऱ्यामध्ये वाढ केली आहे. गुराढोरांच्या चारा-वैरणीसह चांगले उत्पन्न हाती येईल या आशाने बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेरा केला. परंतु यंदा भुईमूग पीक ऐन बहरात असताना पिकाच्या बुडाला बुरशीजन्य आजाराने ग्रासल्याने शेतावर बहरलेल्या भुईमूग पिकाला काहीच झडती नाही आल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे.आणि जे काही भुईमूग शेंगाचे उत्पन्न हाती आले.ते विक्रीसाठी योग्य बाजारपेठ नसल्याने पर्याय म्हणून मराठवाड्यातील शेनगाव, हिंगोली,जिंतूर,मंठा आशा दुरच्या ठिकाणावर विक्रीसाठी जावे लागत असल्याने अनेक भुईमूग उत्पादकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे .तालुक्यातील शहराच्या ठिकाणी भुईमूग खरेदीची बाजारपेठ उपलब्ध झाल्यास भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. आशा प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बाजारपेठ नसल्याने भुईमूग पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:46 AM