वाशिम: यंदाचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला असला तरी, जिल्ह्यात कृषीसेवा कें द्रांवर खते आणि बियाण्यांच्या खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नाफेडकडील शेतमालाचे चुकारे प्रलंबित असून, कर्जमाफीचा फायदाही अद्याप न झाल्याने खरीपाच्या तयारीवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदा ४ लाख ६७०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित केली असून, यासाठी १ लाख १ हजार क्विंटल बियाणे आणि ४४ हजार मेट्रिक टन खतांची मागणीही नोंदविली आहे. नोंदविलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात बियाणे उपलब्ध झाले आहे. एकूण मागणीपैकी सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात अनुदानावरील बियाण्यांचे प्रमाण ५३९२७, तर खाजगी क्षेत्रातील बियाण्यांचे प्रमाण ४७११८ क्विंटल आहे. शेतकºयांनी खरीपासाठी काडी, कचरा वेचणी, नांगरणी आणि वखरणी करून शेतजमीन तयारही केली आहे. तथापि, बियाणे, खतांच्या खरेदीला मात्र अद्यापही म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. गतवर्षीच्या निकृष्ट बियाण्यांच्या प्रकारासह बोंडअळीमुळे शेतकरी धास्तावले असून, बियाण्यांची निवड कशी करायची, ही समस्या त्यांना विचार करायला भाग पाडत आहे. त्याशिवाय बहुतांश शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नाही आणि कर्जमाफीचा फायदा अनेकांना अद्यापही न झाल्याने पीककर्ज मिळेनासे झाल्यामुळे पैशांचीही अडचण येत आहे. त्याशिवाय हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे विकलेली तूर आणि हरभºयाचा पैसाही थांबला आहे. त्यामुळेच बियाणे, खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात खते, बियाणे विक्रीला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:23 PM
वाशिम: यंदाचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला असला तरी, जिल्ह्यात कृषीसेवा कें द्रांवर खते आणि बियाण्यांच्या खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ठळक मुद्देजिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदा ४ लाख ६७०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित केली. १ लाख १ हजार क्विंटल बियाणे आणि ४४ हजार मेट्रिक टन खतांची मागणीही नोंदविली आहे.बियाणे, खतांच्या खरेदीला मात्र अद्यापही म्हणावी तशी सुरुवात झाली नाही.