लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्मार्टच्या फोनच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या फोनवर नवनवे गेम डाऊनलोड करून त्याचा जुगाराच्या खेळासारखा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये चौसर या खेळाच्या धर्तीवर तयार झालेल्या लूडो’ या गेमचा मोठ्या प्रमाणात जुगारासारखा वापर ग्रामीण भागांत सुरू आहे. पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करून हा प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून शुक्रवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. स्मार्ट फोनचा वापर अलिकडच्या काळात सर्वसाधारण झाला असून, या फोनच्या वापराचे तंत्र अगदी अल्पशिक्षीतांनाही अवगत झाले आहे. तथापि, संपर्क साधण्यासह इतर माहिती तात्काळ पाठवून हजारो किलोमीटरवरून प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या या फोनचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अश्लील चित्रफिती व्हायरल करतानाच या फोनमध्ये विविध प्रकारचे गेम डाऊनलोड करणे आणि त्याचा जुगारासारखा वापर करण्याचे प्रकारही आता वाढू लागले आहेत. गेल्या वर्षभरापासून या फोनवर लूडो गेमचा वापर अधिक वाढला आहे. सुरुवातीच्या काळात मनोरंजन म्हणून खेळला जाणारा या गेमचा वापर आता जुगारासारखा होत आहे. एकाचवेळी चार जण या खेळात सहभागी होतात आणि हजारो रुपयांचा जुगार या गेमद्वारे खेळला जातो. यातील वास्तव पडताळण्यासाठी लोकमतच्यावतीने ग्रामीण भागांत स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने युवक मंडळी या गेमवर मोठ्या प्रमाणात पैसे लावत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करून गुप्तपणे हा खेळ सुरू आहे.
‘लूडो गेम’चा वापर आता जुगारासारखा; पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 2:20 PM
वाशिम: स्मार्टच्या फोनच्या गैरवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या फोनवर नवनवे गेम डाऊनलोड करून त्याचा जुगाराच्या खेळासारखा वापर केला जात असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देसुरुवातीच्या काळात मनोरंजन म्हणून खेळला जाणारा या गेमचा वापर आता जुगारासारखा होत आहे. एकाचवेळी चार जण या खेळात सहभागी होतात आणि हजारो रुपयांचा जुगार या गेमद्वारे खेळला जातो.पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करून हा प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून शुक्रवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे.