मुंगळा - मालेगाव तालुक्यातील मूंगळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अधिकाधिक वेळ कुलूपबंद राहत असल्याचा फटका रूग्णांना बसत आहे.मुंगळा येथे आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत आहे. येथे दोन आरोग्य सेविका व एक आरोग्य सेवक आहे. आरोग्य उपकेंद्र काही दिवस सुरळीत तर काही दिवस बंद राहत राहते. उपकेंद्रातील स्वच्छतागृह व शौचालयाची दुरवस्था झाली आहे. उपकेंद्रात नियमितपणे कुणी राहत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. सदर उपकेंद्र सदैव सुरू राहणे अपेक्षीत आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की या प्रकरणाची माहिती घेतो. आरोग्य उपकेंद्र बंद राहत असेल तर संबंधितांविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे डॉ. बोरसे म्हणाले.
मुंगळा येथील आरोग्य केंद्र कुलूपबंद !
By admin | Published: June 25, 2017 1:42 PM