शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणारा बाप आणि मुलगी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 6:18 PM

वाशिम : कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणाºया आठ जणांच्या टोळीतील मूख्य सूत्रधार असलेल्या बापास व त्याच्या मुलीस वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणाºया आठ जणांच्या टोळीतील मूख्य सूत्रधार असलेल्या बापास व त्याच्या मुलीस वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी दोघांनाही यवतमाळ एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन पोलिस कर्मचाºयांसह अन्य एका आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आली असून आठपैकी तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी मंगळवारी दिली.याबाबत अधिक माहिती अशी, १७ मार्च २०१९ रोजी फिर्यादी रणजीत पांडूरंग गायकवाड (शिरूर जि.पुणे) यांना तीन किलो सोने १४ लाख रुपयात देण्याची बतावणी करून तथा प्रत्यक्षात त्यांना १२.५० लाख रुपयांनी गंडा घातल्याप्रकरणी पोफाळी (जि. यवतमाळ) पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारंजा पोलिस दलात कार्यरत कैलास मंगूसिंग राठोड, मंगरूळपीर पोलिस ठाण्यात कार्यरत मुकेश श्रीराम गौरखेडे या दोन पोलिस कर्मचाºयांसह शिवा कानडे (रा.म्हसणी) अशा तिघांना अटक केली. विशेष म्हणजे वाशिमच्या पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत दोन्ही पोलिस कर्मचाºयांना सेवेतून तडकाफडकी निलंबित देखील केले.दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुखदेव पंडित चव्हाण (रा. कारंजा) हा त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाल्यावरून मंगरूळपीर पोलिस दलातील अरविंद सोनवणे यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. सुखदेव चव्हाणची कसून चौकशी केली असता, त्याने रणजित गायकवाड यांना १२.५० लाखांनी लुटल्याची कबूली देण्यासोबतच यातील अन्य आरोपींची नावेही उजागर केली. विशेष गंभीर बाब म्हणजे या गुन्ह्यात त्याची मुलगी सपना सुखदेव चव्हाण हिचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, बापास व मुलीस ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी यवतमाळ ‘एलसीबी’कडे सोपविण्यात आल्याची माहिती शिवा ठाकरे यांनी दिली. 

सुखदेव चव्हाणने पातूर आणि शेगावातील गुन्ह्यांचीही दिली कबूलीसुखदेव चव्हाण व त्याच्या टोळीने रणजीत राठोड यांना १२.५० लाखांनी लुटण्यासोबतच पातूर (जि. अकोला) येथे ७ नोव्हेंबर २०१८ रोजी पवन पांडुरंग कापसे यांची फसवणूक करून ३ लाख रुपये लुबाडले. तसेच शेगाव (जि. बुलडाणा) १८ मे २०१८ रोजी लईक हसन यांची १२ लाख रुपयांनी फसवणूक केली. या दोन्ही गुन्ह्यांची कबूली सुखदेव चव्हाण याने तपासादरम्यान दिली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी