लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : तालुक्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडव्दारे जोडणाºया महत्वाकांक्षी ‘महानेट’ (भारतनेट) प्रकल्पाच्या दुसºया टप्प्याला तहसीलदार आर. यु. सुरडकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय, रिसोड येथील परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. रिसोड या तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती या प्रकल्पांतर्गत जोडण्यात येणार आहेत. महानेट प्रकल्प राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळामाफत राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून वाशिम जिल्हयातील ४ तहसील कार्यालय व त्याअंतर्गत येणाºया ३४६ ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर नेटवर्क ब्रॉडबँडव्दारे जोडले जाणार आहे. ग्रामस्तरावरील नागरीकांना डिजीटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत चार तालुक्यात १५५० किमी. अंतर केबल टाकून ३४६ ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून स्टरलाईट लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. तहसील रिसोड येथे दुसºया टप्प्याच्या शुभारंभाला माहिती व तंत्रज्ञान महामंडळात जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख, गणेश पोधाडे, स्टरलाईट कंपनीचे रुकमेश कुमार, अरुनेंद्र तिवारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. पी. एम. सी. रंजनकुमार तसेच टी. पी. ए. चे इंजिनियर विजय गायकवाड, अंगद यादव व मंगुरामजी तसेच महेंद्र अमृतकर व सचिन उगले यांचीही उपस्थिती यावेळी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनेद शेख यांनी केले. त्यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती प्रस्ताविकात माहिती दिली.
रिसोड तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींना ‘महानेट’ची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 5:03 PM