मानोरा (वाशिम) : बंजारा समाजाचे धर्मगुरु संत डॉ. रामराव महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबुसिंग महाराज यांची ३ नोव्हेंबर रोजी एकमताने निवड करण्यात आली.बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरु संत रामराव महाराज यांचे ३० आॅक्टोबर रोजी निधन झाले. त्यांचा पुढील वारसा चालविण्याकरीता ३ नोव्हेंबर रोजी भिमा नायक, खेमा नायक, हेमा नायक यांच्या घराण्याची बैठक घेण्यात आली. यावेळी संत रामराव महाराज यांचे पुतने महंत बाबुसिंग महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून एकमताने निवड झाली. या वृत्ताला महंत बाबुसिंग महाराज यांनी दुजोरा दिला. यावेळी उमरी, वाईगौळ, पोहरादेवी या तिन्ही घराण्यातील महाराजांचे वंशज हरीचंद राठोड, अनिल राठोड, महंत कबिरदास महाराज, महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज व संत रामराव महाराज यांचे निकटवर्तीय भक्त उपस्थित होते. यावेळी संत रामराव महाराज यांना अग्नी दिलेल्या ठिकाणी मंदिर निर्माण करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. संत रामराव महाराज यांचा अस्थीकलश देशभर फिरवण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याचे महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले.
संत रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबुसिंग महाराजांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 5:38 PM
Mahant Babusing Maharaj News संत रामराव महाराज यांचे पुतने महंत बाबुसिंग महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून एकमताने निवड झाली.
ठळक मुद्देया वृत्ताला महंत बाबुसिंग महाराज यांनी दुजोरा दिला.संत रामराव महाराज यांचे ३० आॅक्टोबर रोजी निधन झाले.