वाशिम : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार भावना गवळी यांनी वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे दुपारच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला. वाशिम शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला असतांना दुपारच्यावेळी मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारी २ वाजताच्या सुमारास भावना गवळी सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या राजेंद्रप्रसाद विद्यामंदिरामध्ये येवून आपल्या मतदानाचा हक्क बजवला.
दरम्यान, प्रशासनाच्यावतिने करण्यात आलेली जनजागृती वाखाण्याजोगी असतांना मतदार यादीत नावे शोधण्यासाठी झालेली झुंबडने प्रशासनाच्या जनजागृतीव पाणी फेरल्याचे चित्र वाशिम शहरातील मतदान केंद्रावर दिसून आले.
लोकसभा निवडणुकीसाठी मदत कक्ष, मतदान केंद्रावर मतदान यादी, मतदार यादीत शोधण्याचे प्रशिक्षणासह मोबाईल अॅप्स बद्दल सुध्दा माहिती देण्यात आली होती. त्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. परंतु नेहमीची मतदान केंद्राबाहेर बुथवर जावून तेथे चौकशीकेल्यानंतरचं मतदान करणाºया मतदारांना याचा त्रास सहन करावा लागला. ज्यांनी प्रशासनाच्या जनजागृतीचा फायदा घेतला त्यांनी ताबडतोब आपले नाव मतदार यादीत शोधून मतदान करुन मोकळे झालेले दिसून आले. अनेक मतदान केंद्राबाहेर टाकण्यात आलेले पेंडाँल व तेथे ठेवण्यात आलेली यादी पाहण्यासाठी अनेक मतदारांनी झुंबड केल्याचे दिसून आले.