लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सहायक कक्ष अधिकारी विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा रविवार, १६ जुलै २०१७ रोजी सकाळी १०.३० ते १२ या कालावधीत शहरातील ११ परीक्षा केंद्रांवर पार पडली. सदर परीक्षेला ४,०८६ पैकी ३,५६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस स्कूल, एसएमसी इंग्लिश स्कूल, शिवाजी विद्यालय, बाकलीवाल विद्यालय, तुळशीराम जाधव महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, जवाहर नवोदय विद्यालय, रेखाताई कन्या शाळा, या ११ केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली. या परीक्षेकरिता एकंदरित ४,०८६ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी आज ३५६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली; तर ५२० विद्यार्थी गैरहजर होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
चोख बंदोबस्तात झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा!
By admin | Published: July 17, 2017 2:47 AM