वाशिम : महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीला जिल्हाभरातील शिवालयांवर भोळ्या शंकराच्या दर्शनासाइी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. यानिमित्त अनेक मंदिरांवर उपवासाच्या फराळाचे वितरण झाले. १४ फेब्रुवारीला यानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.जिल्ह्यातील एकट्या वाशिम शहरात अकरा पूर्ण आणि एक अर्धे असे एकूण साडेअकरा स्वयंभू शिवलिंग आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर ठिकाणीही प्रसिद्ध शिवमंदिरे असून सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीच्या औचित्यावर मंगळवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. बहुतांश महिला-पुरूष भाविकांना यादिवशी उपवास असल्याने साबुदाणा ऊसळीचे वितरण करण्यात आले. बुधवारी वाशिममधील पाळेश्वर संस्थान, मालेगावातील तामकराड यासह इतरही अनेक मंदिरांवर भव्यदिव्य स्वरूपात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रिसोड शहरात संत अमरदास बाबा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १३ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण असून, सध्या महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे. पंचक्रोशीतील महिला या पुरी लाटून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या असल्याचे दिसून येते. संत अमरदास बाबा संस्थानच्यावतीने महाप्रसादाचे नियोजन चोख बजावण्यात येते. पूरी ४५ क्विंटल, बुंदी १५ क्विंटल, भाजी २५ क्विंटल असा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. जवळपास २१ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
महाशिवरात्री : भाविकांच्या गर्दीने गजबजली वाशिम जिल्ह्यातील शिवालये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 5:19 PM
वाशिम : महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीला जिल्हाभरातील शिवालयांवर भोळ्या शंकराच्या दर्शनासाइी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.
ठळक मुद्देजिल्ह्यातील एकट्या वाशिम शहरात अकरा पूर्ण आणि एक अर्धे असे एकूण साडेअकरा स्वयंभू शिवलिंग आहेत.सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीच्या औचित्यावर मंगळवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती.महिला-पुरूष भाविकांना यादिवशी उपवास असल्याने साबुदाणा ऊसळीचे वितरण करण्यात आले.