शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

वाशिम जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम पार पडले.जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम पार पडले.जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा विधी अधिकारी महेश महामुने, नायब तहसीलदार गिरीश जोशी, घनश्याम डाहोरे, प्रकाश डाहोरे, नागपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिरपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसरपंच असलम गवळी व गणेश अंभोरे यांच्या हस्ते गांधीजी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी गांधीजी, लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. कार्यक्रमाला माधव देशमुख, किशोर इंगळे, संजय भालेराव, संजय गौर, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप जोशी, संतोष देशमुख, संतोष ताकतोडे, राजू गोरे, रमेश भालेराव, आरोग्य कर्मचारी नामदेव पुंड, शितिज लांडगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. प.दी. जैन कला महाविद्यालय अनसिंग येथे महात्मता गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शनी तसेच गांधीजींच्या जीवन चरित्रावर आधारीत व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुल्हानणे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मानकर, प्रा. भोरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधीLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्री