लोकमत न्यूज नेटवर्कपांडव उमरा : सन २०१६-१७ या वर्षाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार सावंगा जहाँगीर गावाला मिळाला होता. या पुरस्काराची मिळालेली रक्कम दोन लाख रुपये अडीच वर्ष होवूनही कोणत्याच विकास कामासाठी खर्च करण्यात आली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासुन राज्यामध्ये गावाची शांततेतुन समृध्दीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली. या मोहीमेंतर्गत सावंगा गाव सहभागी होवून असुन सन २०१६ -१७ या वर्षात तंटामुक्त गाव समितीने ग्राम पंचायत व गावकºयाच्या सहकार्यातुन वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबवुन गावातील भांडण तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यात तंटामुक्त सावंगा जहॉगीर गाव समितीचा मोठा वाटा होता. यामुळे शासनाने गावाला तंटामुक्त घोषीत करुन सन २०१६ -१७ मध्येच दोन लाख रुपयाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. पुरस्कार रक्कमेचा धनादेश मिळुन अडीच वर्ष झाली आहेत, पण अजुनही तंटामुक्त पुरस्कार निधीमधून कोणकोणती विकासात्मक कामे करायची याचे नियोजन करण्यात आले नसल्याचे चित्र आहे. तंटामुक्त पुरस्कार निधी मधुन मुलींना जन्म देणाºया मातांना ‘कन्यारत्न जन्मानंद भेट’ म्हणुन आणि गावातील मुली सासरी गेलेल्या असतील व त्यांनी मुलीला जन्म दिला असेल अशा सर्व मातांना माहेर भेट म्हणुन प्रत्येकी ५०० रुपये देणे अपेक्षित होते. तसेच गावातील महिला बचत गटात ज्या महिलांनी सर्वोकृष्ट कार्य केले अशा तीन महिलांची निवड ग्रामसभेव्दारे करुन त्यांना ५०० रुपये पर्यंत पारितोषीक आणि गावातील युवक जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा, कला, संगीत व साहित्य या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करतील यांना ५०० रुपयेपर्यंत पारितोषीक दहा व्यक्तींना देण्याबाबत ग्रामसभेतुन ठरविणे आवश्यक असतांना सावंगा जहॉगीर ग्राम पंचायतने दोन वर्षाअगोदर मिळालेला तंटामुक्त पुरस्कार रक्कमेचा विनीयोग परिशिष्ट (७) नुसार कुठलेही विकास कामे केलेले दिसून येत नाही. त्यामुळे सदर पुरस्कार निधीचे काय करण्यात आले असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला दिसून येत आहे
तंटामुक्त पुरस्कार विनियोगाकरिता अंदाजपत्रक तयार करायला टाकले आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर विकासात्मक कामे करु.- सतिष इढोळे, ग्रामसचिव ग्रा.पं.सावंगा जहॉगीर ता.जि.वाशिम