आचार्य १०८ विरागसागर महाराज यांचे परम शिष्य प. पू १०८ विशेष सागरजी महाराज यांनी मार्गदर्शन करताना जैन बांधवांना सांगितले की, कोरोनासारख्या या महामारीमध्ये तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वच मंदिरे बंद आहेत. म्हणून शासन आदेशाचे पालन करून महावीर जयंती यावेळी घरीच साजरी करावी. आपल्या कुटुंबाची काळजी करावी. अहिंसाचे पुजारी जैन शासनाचे नायक १००८ भगवान महावीर स्वामी यांच्या २६२० व्या जयंती महोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. कोरोनातून संपूर्ण जग बाहेर पडावे, याकरिता सकाळीच परिवारात सामूहीक महावीर अष्टक, स्तोत्राचे पाठ करावे तसेच सकाळीच सर्व जैन बांधवांनी आपल्याला घरांवर मंगलाष्टक पूर्वक शुध्दी करुन घराच्या मध्यात किंवा ईशान्य दिशेला ९ वेळा नमोकार मंत्राचा जप करुन धर्म ध्वज लावावे. २५ एप्रिल रोजी शांती मंत्राचा जप करावा तसेच विश्वशांती महायज्ञ करुन आपल्या परिवारासह विश्वात शांती व्हावी, याकरिता महावीर भगवानला प्रार्थना करावी. सायंकाळी सर्व जैन बांधवांनी आपल्या घरासमोर तुपाचे दीप लावावे. हे करीत असताना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन मुनीश्री १०८ विशेष सागर महाराजांनी जैन बांधवांना केले आहे.
घरात राहुनच साजरी करावी महावीर जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:41 AM