मालेगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी महावितरणचे मालेगाव येथील उपविभागीय अभियंता शरद शंकरराव पांडे यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध आणि संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई होण्याच्या मागणीसाठी महावितरणचे मालेगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी १ नोव्हेंबर रोजी काम बंद आंदोलन पुकारले.
उपविभागीय अभियंता पांडे हे ३१ आॅक्टोंबर रोजी कर्तव्यावर असताना, दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी सुरूवातीला शिवीगाळ करीत वाद घातला. त्यानंतर अश्लिल शिविगाळ आणि मारहाण केली. याप्रकरणी उपविभागीय अभियंता पांडे यांनी मालेगाव पोलिसांत फिर्याद दिल्याने संबंधितांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. पांडे यांच्यासमवेत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह अभियंते व कर्मचारीदेखील पोलीस स्टेशनमध्ये होते. १ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारून या घटनेचा निषेध नोंदविला तसेच यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. मारहाणीच्या घटनांमुळे अधिकारी व कर्मचाºयांचे मनोधैर्य खचून जाते, अशा दहशतीच्या वातावरणात शासकीय कामकाज कसे करावे, असा प्रश्नही महावितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी उपस्थित केला. या संपात मालेगाव तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व अभियंते व कर्मचारी १०० टक्के सहभागी झाले आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण होऊ नये म्हणून कामाच्या ठिकाणी संरक्षण देण्यात यावे, कुणी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अधिकारी व कर्मचाºयांनी केली आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया, कार्यकारी अभियंता तायडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरी, मालेगाव शहर सहाय्यक अभियंता विनोद क्षीरसागर, मालेगाव ग्रामीणचे सहाय्यक अभियंता प्रशांत पडघान, मेडशीचे सहाय्यक अभियंता रवींद्र निर्मल, शिरपूरचे सहाय्यक अभियंता अर्जुन जाधव, कनिष्ठ सहाय्यक संजय जांगीड, लेखापाल राम कुटे यांचेसह तालुक्यातील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मारहाणीच्या या घटनेचा निषेध नोंदविला.