वाशिम: सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना महावितरणच्या वतीने अधिकृत वीजपुरवठा घेण्याचे कितीही आवाहन करण्यात येत असले तरी सार्वजनिक मंडळे मात्र याकडे कानाडोळा करीत सरळ वीज खांबावरून विद्युत पुरवठा घेतात. वाशिम शहरातील नवदुर्गा मंडळांनीही सरळ खांबावरून विद्युत पुरवठा घेतला असून, हजारो रु पयांची वीज चोरी होत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे. जिल्हय़ातील ४७५ पैकी केवळ ३८ नवदुर्गा मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. महावितरणच्या वतीने घरगुती ग्राहकांना ३.७६ पैसे तर नवदुर्गा मंडळांना ३.७१ पैसे प्रती युनिट याप्रमाणे वीजपुरवठा केल्या जातो. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक नवदुर्गा मंडळे याकडे कानाडोळा करतात. तसेच सरळ खांबावरून किंवा कुणाच्या दुकानातून अन्यथा घरातून वीजपुरवठा घेतल्या जातो. शहरातील काही सार्वजनिक दुर्गा मंडळांनी सरळ खांबावरून वीजपुरवपठा घेतला आहे. नवदुर्गा उत्सवादरम्यान नऊ दिवस रोषणाई करण्यात येते. प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाजवळ मोठे हॅलोजन लावण्यात आले आहेत. तसेच लायटिंग लावून संपूर्ण परिसर प्रकाशमान करण्यात आला. सायंकाळी सहा वाजतापासून तर रात्रभर लायटिंग व हॅलोजन सुरू असतात. त्यामुळे हजारो युनिट विजेची चोरी होत आहे.
नवदुर्गा मंडळांचा महावितरणला शॉक
By admin | Published: October 17, 2015 1:55 AM