लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वाशिम मंडळांतर्गत असलेल्या सहाही तालुक्यामध्ये वीज ग्राहकांसाठी उपविभागनिहाय वीज बिल दुरुस्ती शिबिर गुरुवार, ८ जून २०१७ रोजी आयोजित केले आहे. वीज ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणच्या वाशिम विभागाच्या वतीने ८ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव व मानोरा येथील उपविभागीय कार्यालयामध्ये वीजबील दूरूस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांच्या वीजबिलासंबंधी असलेल्या तक्रारी सोडविल्या जातील. ग्राहकांनी तक्रार देताना संबंधित वीजबील व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. शिबिराच्या दिवशी संबंधित कामाकरिता उपविभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले.
८ जून रोजी महावितरणचे वीज बील दूरुस्ती शिबिर !
By admin | Published: June 06, 2017 7:22 PM