लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.शेतीला सिंचनाची जोड मिळावी, यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जातात. वाशिम जिल्ह्यात काही प्रकल्प निर्माण करण्यात आले. तथापि, रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा प्रश्न अद्याप शासनाने हाती घेतला नाही. रिसोड व मालेगाव तालुक्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. शेतीला सिंचनाची जोड नसल्याने अपेक्षीत उत्पादन घेण्यात अडथळे निर्माण होत आहे. वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्याच्या दृष्टिने जलसंपदा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. वाशिम जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध असून अधिकांश शेतजमिन यामुळे सिंचनापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, हे तीन मध्यम आणि इतर १२२ सिंचन प्रकल्पांव्दारे शेतकºयांना रबी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. ३ लाख ९२ हजार हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्रावर सिंचनाची प्रभावी सोय होणे क्रमप्राप्त आहे. पूर्ण झालेले आणि बांधकामाधिन, अशा १६१ प्रकल्पांपासून ८४ हजार २४२ हेक्टरवर सिंचन क्षमता प्रस्तावित होती. प्रत्यक्षात १३६ प्रकल्पांपासून केवळ ६० हजार ६३३ हेक्टरवरच सिंचन क्षमता निर्माण झाली. आजमितीस सिंचन अनुशेष तब्बल ५०२ कोटी रुपयांवर पोहचला आहे. जलसंपदा विभागाने सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना मान्यता द्यावी, पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करावा आणि रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा मुद्दा हाती घ्यावा, अशी मागणी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली.
सिंचन अनुशेष कायम; शेतक-यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:41 PM
वाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.
ठळक मुद्देकृषी सभापतीचे जलसंपदा विभागाला निवेदन निधी उपलब्ध करण्याची मागणी