मालेगाव (जि. वाशिम) : कित्येक दिवसांपासून मालेगाव व मानोरावासीयांची नगरपंचायतीची मागणी अखेर १७ जुलैला पूर्ण झाली असून, नगर विकास मंत्रालयाच्या आदेशान्वये मालेगाव व मानोरा नगरपंचायातीला मान्यता मिळाली आहे. मालेगाव शहरातील वाढती लोकसंख्या तसेच ग्रा.प.मार्फत होत असलेल्या निधी कमतरतेमुळे शहराचा विकास खुंटला होता वाशिम जिल्हय़ातील सर्वात मोठी ग्रा.पं.असलेल्या मालेगाव शहराला नगरपंचायत म्हणून दर्जा मिळावा यासाठी अनेक लोकांनी पाठपुरावा केला होता काही विरोधी गटांकडून त्याला विरोधसुद्धा झाला होता मात्र १७ जुलै २0१५ च्या शा.नि.एम.यू.एन.२0१४ /प्र.क्र.१२९२ न.वित्र.१८/१७जुलै २0१५ च्या पत्रानुसार नगर विकास मंत्रालयातील आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेशसुद्धा तहसिल कार्यालयामध्ये येऊन धडकले आहे. कक्ष अधिकारी संजय हेंद्रे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या स्वाक्षरीने आलेल्या पत्रामध्ये नमूद आहे की शासनाने १/३/२0१४ च्या अधिसूचनेनुसार मालेगाव व मानोरा या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगर पंचायतीची स्थापना करण्याबाबतची प्राथमिक उद्घोषणा केली आहे. त्यावर नगरविकास विभागाने १७ जुलै २0२0१५ रोजी या दोन नगर पंचायतीची प्रसिद्धी केली आहे. या निर्णयाची माहिती वार्यासारखी शहरात पसरताच अनेकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. गोपाल पाटील राउत, गोविंद लाहोटी, मुन्ना मुंदडा, संजय देशमुख, मुन्ना यादव, नितीन काळे उपस्थित होते. शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून, यामुळे शहराचा निश्चितच विकास होईल, असे मत सरपंच डॉ. विवेक माने यांनी व्यक्त केले.
मालेगाव व मानोरा नगर पंचायत मंजूर
By admin | Published: July 18, 2015 2:15 AM