लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगमधील चुकांचा पाढा वाचला. जोपर्यंत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगचे १00 टक्के काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्राहकांना बिल बुकावरून धान्य देण्याची परवानगी द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. दरम्यान, मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ‘पॉस मशीन’ तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला. मालेगाव येथील घटनेचा धागा पकडून १२ जानेवारीला स्वस्त धान्य व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी दुकानदारांनी बायोमेट्रिक पद्धतीने रेशन धान्य वितरणात येणार्या अडचणींचा पाढा वाचला. साधारणत: अडीच ते तीन वर्षांपूर्वी शिधापत्रिकाधारकांचे संगणकीकरणाचे अर्ज भरून घेण्यात आले. या अर्जावर कुटुंबातील प्रमुख, महिलांचे छायाचित्र, अन्य सदस्यांचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांकाची झेरॉक्स जोडून इत्थंभूत माहितीसह सदर अर्ज तहसील कार्यालयात सादर केले. तहसील कार्यालय येथून सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात संगणकीकृत काम करताना या अर्जांमध्ये अनेक चुका झाल्याचा आरोप यावेळी दुकानदारांनी केला. काही शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांची नोंद झाली नाही तर काही एपीएलचे कार्ड शुभ्र योजनेत समाविष्ट केले तर काही एपीएल कार्ड अंत्योदयमध्ये तर काही अंत्योदयचे कार्ड एपीएलमध्ये समाविष्ट केल्याने घोळ निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या चुकांची दुरुस्ती व्हावी म्हणून परत एकदा स्वस्त धान्य दुकानदारांनी शिधापत्रिकांची अचूक व इत्थंभूत माहिती सादर केली. त्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन कार्ड व आधार सिडिंगचे काम करताना चुका झाल्याचे निदर्शनात आणून दिले. या चुकांमध्ये घोळ निर्माण होत असल्याचा दावा यावेळी दुकानदारांनी केला. ‘पॉस मशीन’शिवाय धान्य पुरवठा करू नका तसेच मशीनमधून जेवढा माल निघतो, तेवढाच माल संबंधित व्यक्तींना देण्यात यावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा विभागाने दिलेले आहेत. दुकानदारांकडून किरकोळ त्रुटी राहिल्या तर थेट दंडात्मक कारवाई केली जाते. दुसरीकडे आधार सिडिंगमधील चुकांमुळे ग्राहकांच्या रोषालादेखील बळी पडावे लागत आहे. यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले. मालेगाव येथील प्रकारही या चुकांमुळे घडला असून, दुकानदाराला ग्राहकाच्या रोषाला बळी पडावे लागले, असे दुकानदारांनी निवेदनात नमूद केले. याप्रकरणी दुकानदारांना न्याय द्यावा, आधार लिंकिंगमधील चुकांची दुरुस्ती करावी, पॉस मशीनसंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, आदी मागण्या केल्या.
मालेगाव घटनेचे पडसाद : रेशनच्या ‘पॉस मशीन’ परत करण्याचा निर्णय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 3:00 AM
वाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगमधील चुकांचा पाढा वाचला. जोपर्यंत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगचे १00 टक्के काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्राहकांना बिल बुकावरून धान्य देण्याची परवानगी द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. दरम्यान, मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ‘पॉस मशीन’ तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर