मालेगाव: स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अभिनव प्रतिकृती सादर केली आहेत. या प्रदर्शनीत तुषार विष्णु नरोकार या विद्यार्थ्यांने प्रदुषण नियंत्रणावरील उपायाबाबत तयार केलेली प्रतिकृती सर्वोत्कृष्ट ठरली. प्रदर्शनीचे उदघाटन संस्थेचे संचालक रामबाबूजी मुंदडा,व्यवस्थापक गोविंदजी पुरोहित तसेच संचालक जगदीशजी बळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक वसंतराव अवचार तर प्रमुख मार्गदर्शक पर्यवेक्षक सुनील राठी, उपमुख्याध्यापक सतिष नवगजे मंचावर उपस्तित होते. विज्ञान मंडळ अध्यक्ष अंभोरे, तसेच विज्ञान शिक्षक गजानन पाटील, शिक्षिका मुंदडा, राजपुत, यांच्यासह स्वप्निल जोशी, काटेकर, परमेस्वर नव्हाळे, मोरे, इन्नानी, हर्षल अढागळे, संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील आधारित आकर्षक प्रतिकृती तयार करुन प्रदर्शनीते सहभाग घेतला. ही विज्ञान प्रदर्शनी वर्ग ६ ते ८ व वर्ग ८ ते १२ अशा दोन गटांत घेण्यात आली. वर्ग ६ ते ८ या गटातील तुषार विष्णु नरोकार या विद्यार्थ्यांने प्रदुषण नियंत्रणावरील उपायाबाबत तयार केलेली प्रतिकृती सर्वोत्कृष्ट ठरली. याच गटात अनिरुद्ध बळी या विद्यार्थ्याने तयार केलेली सोलार पॉवर कार्टची प्रतिकृतीने द्वितीय, तर प्रथमेश नेवासकर या विद्यार्थ्याने तयार केलेली टाकाऊ वस्तू आणि कचरा व्यवस्थापनाची (वेस्ट मॅनेजमेंट) प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला. वेदांगिनी बळी या विद्यार्थिनीला प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाला. वर्ग ८ ते १२ या गटात प्रथम क्रमांक प्रतिक काटेकर व सुरज खटोड यांच्या प्रतिकृतीला प्रथम, अभिजित पवार व तुषार तायडे यांच्या प्रतिकृतीला द्वितीय, तर गायत्री शर्मा व सई अनसिंगकर या विद्यार्थिनीच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप अंभोरे, सचिन देवळे, सिद्धार्थ भालेराव यांनी परिश्रम घेतले. विषयाची आवड, तसेच चिकित्सक वृति व वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यात निर्माण व्हावा या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. संचालक मंडळाच्या सुचनेनुसार सदर विज्ञान प्रदर्शन ६ जानेवारी २०१८ पर्यंत जनतेसाठी खुले करण्यात येईल.
मालेगाव: विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी साकारल्या अभिनव प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:38 PM
मालेगाव: स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अभिनव प्रतिकृती सादर केली आहेत
ठळक मुद्देना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ही विज्ञान प्रदर्शनी वर्ग ६ ते ८ व वर्ग ८ ते १२ अशा दोन गटांत घेण्यात आली. या प्रदर्शनीत तुषार विष्णु नरोकार या विद्यार्थ्यांने प्रदुषण नियंत्रणावरील उपायाबाबत तयार केलेली प्रतिकृती सर्वोत्कृष्ट ठरली.