लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारीसंपावर गेले आहेत . परिणामी अत्यवश्यक सुविधा पासून नागरिक वंचित राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील काम करणाºया कर्मचाºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाने दिलेले आश्वासन दोन वर्ष होऊनही पुर्ण करण्यात आले नाही. या संदभार्तील अंमलबजावणी होत नसल्याने १५ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यातील नगर पंचायती व नगर परिषद कर्मचाºयांनी निदर्शने केली होती. तरी सुध्दा याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे १ जानेवारीपासून कामबंद आंदोलन कर्मचाºयांनी सुरु केले आहे. सफाई कामगरांचा आकृतिबंध मंजूर करुन तात्काळ समायोजन करावे, पात्र आणि अतिरिक्त कर्मचाºयांचे समायोजन न. प. मध्ये करण्यात यावे , जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी , सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत . यामध्ये गणेश भालेराव यांच्यासह एकनाथ आढाव, बबन पखाले, महादेव राऊत, संजय दहात्रे, शंकर इंगोले, प्रमोद हरणे, विशवपाल काटेकर, संतोषखवले, शे बबु ,अविकिरणकाटेकर, घायाळ, विठल चोपडे, , इरफान, गणेश भनंगे, शंकर बळी, माणिक मोहले, नागनाथ माने, सतिश महाकाल, शोएब, रवि शर्मा, शंकर बळी, अतुल बळी, संतोष बगगन, नंदू सुर्वे, लखन खोडे, गजानन गायकवाड, गंगा पवार, अवचार व सर्व कमेचारी सहभागी झाले होते.
मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:25 PM