लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात मालेगाव पंचायत समिती प्रथम ठरली असून, मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाºयांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. शासनातर्फे सन २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात जिल्हानिहाय घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार अमरावती विभागात वाशिम जिल्हा ५ हजार ५६२, बुलडाणा जिल्हा १४ हजार ३१०, यवतमाळ जिल्हा १८ हजार ४३४, अमरावती जिल्हा ३४ हजार २८ आणि अकोला जिल्ह्यात १९ हजार ३१३ असे घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आॅगस्ट २०१८ अखेर अमरावती विभागात ६८.७० टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उद्दिष्टपूर्तीत उल्लेखनीय कामगिरी करणाºया पंचायत समित्यांचा गौरव मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक धनंजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीने सर्वाधिक उद्दिष्टपूर्ती करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते मालेगावचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत समित्यांना ‘अॅक्शन प्लॅन’ आखून दिला आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याने घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषदेची कामगिरी सरस ठरत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत मालेगाव पंचायत समिती विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:21 PM
वाशिम - प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात मालेगाव पंचायत समिती प्रथम ठरली असून, मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाºयांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
ठळक मुद्देआॅगस्ट २०१८ अखेर अमरावती विभागात ६८.७० टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मालेगाव पंचायत समितीने सर्वाधिक उद्दिष्टपूर्ती करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.