मालेगाव (वाशिम) : येथील दुर्गा ज्वेलर्समधून दिवसाढवळ्या सोन्याच्या दागिन्यांसह २३.६२ लाखांचा ऐवज लंपास करणा-या चोरट्यास तत्काळ अटक करा. यासह वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याच्या मागणीसाठी येथील सराफा व्यावसायिकांनी सोमवार, ९ जुलै रोजी कडकडीत ‘बंद’ पाळला.यासंदर्भात मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे, की ७ जुलै रोजी प्रविण कुंदनलाल वर्मा यांच्या दुर्गा ज्वेलर्स या दुकानातून २३.२२ लाखांचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेला तीन दिवस होऊनही पोलिसांना आरोपीचा कुठलाच सुगावा लागलेला नाही. तथापि, पोलिस प्रशासनाने तपासाची चक्र गतीने फिरवून आरोपीस तत्काळ अटक करावी, दुकानानजिक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी विनोद बानाईतकर, गोवर्धन वर्मा, रमेश नवघरे, नंदलाल वर्मा, रूपेश बनाईतकर, विलास भांडेकर, सागर वर्मा, उमाकांत भांडेकर, किशोर वर्मा, सुरेश वर्मा, सुरज वर्मा, कचरुलाल वर्मा, प्रदीप गौरकर, गणेश अर्धापूरकर, ज्ञानेश्वर वाढनकर, तेजस कल्याणकर, सचिन भांडेकर, राम गडकर, गौरकर, महेश अंजनकर, प्रवीण गौरकर, नवल वर्मा, प्रवीण पाटील, हनुमंत पाटील, सुरेश अंजनकर यांच्यासह अन्य सराफा व्यावसायिकांच्या स्वाक्षºया आहेत.
मालेगावातील सराफा व्यावसायिकांनी पाळला ‘बंद’!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:54 PM