लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसाेड तालुक्यातील चाकोली येथिल पोलीस पाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांनी ८ फेब्रुवारी सायंकाळी ६.१५ वाजता १२ वर्षीय मुलगा ओम जगदीश गरकळ हा दुकानावर चहापुडा आणायला जात असताना पोलीस पाटील गोविंद गरकळ याने छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केले. अशा प्रकारची तक्रार दिलीप रामराव गरकळ यांनी रिसोड पोलीस स्टेशनला केल्यावरून पोलीस पाटलाविरूद्ध भादंवी कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बीट जमादार अनिल कातडे करीत आहेत.शेतातील वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बंदुकीचा अनेक शेतकरी वापर करतात; परंतु चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी वन्यप्राण्याऐवजी थेट एका १२ वर्षांच्या मुलाच्या उजव्या दंडावर शेतकरी छऱ्याच्या बंदुकीने गोळी झाडून त्याला जखमी केले. या घटनेची गावात चर्चा होताच पोलीस पाटील गोविंद गरकळ याने आपली शेतकरी बंदूक लगेच मोडून टाकली. ८ फेब्रुवारीला सायंकाळी ओम गरकळ या जखमी मुलाला घेऊन रिसोड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांच्या नेतृत्वाखाली बीट जमादार अनिल कातडे करीत आहेत.
पाेलीस पाटलाने अल्पवयीन मुलावर झाडली बंदुकीची गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:18 PM