गतवेळी ज्यांची सत्ता होती त्यांना मतदारांनी नाकारले आहे. त्यामध्ये धामणी मानोरा ग्रामपंचायतमध्ये माजी सभापती हेमेंद्र ठाकरे यांची सत्ता गेली, तर मनसेचे तालुका अध्यक्ष मनोज खडसे यांचा पराभव झाला, मनसेचे शहर अध्यक्ष महादेव भस्मे यांची अनामत रक्कम जप्त झाली. इंझोरी येथे भाजपच्या जि.प. सदस्य वीणाताई जयस्वाल, गजानन भवाने, धनराज दिघडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. वाईगौळ येथे शिवसेना संपर्क प्रमुख भोला राठोड यांच्या गटाचा पराभव झाला. कुपटा येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती अब्दुल बशीर यांना मतदारांनी नाकारले. तळप बु. येथे भाजपचे नेते नीलकंठ पाटील यांना ही सत्ता गमवावी लागली. कोंडोली येथे बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव देशमुख, सत्ताधारी सरपंच देवराव पाटणकर यांनाही सत्ता कायम ठेवता आली नाही. गव्हा येथे रा. काँ. तालुकाध्यक्ष यशवंतराव देशमुख व विक्रांत देशमुख यांना पराभव, तर रतनवाडी येथे माजी जि. प. सदस्य रणवीर सोनटक्के यांच्या गटाचा पराभव झाला.
..........
सत्ता कायम ठेवली
गव्हा, कुपटा, आसोला, वरोली या ग्रामपंचायतींनी पुन्हा सत्ता प्रस्थापित करून गड कायम ठेवला.
अनेक ठिकाणी महिलाराज
महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, त्यापेक्षाही जास्त महिला विजयी झाल्या. त्यामुळे महिलाराज आले.
जेसीबीत बसून मिरवणूक
धामणी मानाेरा ग्रामपंचायतच्या विजयी उमेदवारांनी जेसीबीमध्ये बसून गुलाल उधळत मिरवणूक काढली.