आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांकडून गुरुवारी गावातील गर्भवती व स्तनदा मातांसह ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर ग्रामसचिवांनी शुक्रवारी सभा घेऊन स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामसचिवालयाचे बांधकाम रखडले
वाशिम : शिरपूर जैन येथील ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम २० वर्षांपूर्वी सुरू झाले. मात्र, विविध स्वरूपातील अडचणींमुळे ते अद्याप अर्धवट अवस्थेत रखडलेले आहे. कै.कोंडबातात्या ढवळे विद्यालयानजीक इमारतीची उभारणी होत आहे.
आयुर्वेदिक दवाखाना इमारतीची दुरवस्था
वाशिम : रहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था झालेली आहे. भिंतीला भेगा पडल्याने इमारत कोसळू शकते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तथापि याकडे लक्ष दिले जात नाही.