मंगरुळपीर (जि. वाशिम) : तालुक्यातील शेलुबाजार येथे एक तर शहरात तीन ठिकाणी वरली मटक्यावर पोलिसांनी २२ जुलै रोजी धाड टाकून ८ हजार ३७0 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील शेलुबाजार येथे दुपारी १.३0 वाजता पोलिसांनी वरली मटक्यावर धाड टाकुन आरोपी दिलीप रामभाऊ हिवरे रा.शेलुबाजार यास अकोला रोडजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळतांना पकडले असनूा सट्टा पट्टी चिठय़ा व नगदी ४४00 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय मंगरुळपीर शहरातील व्हिडीओ चौक येथे आरोपी युनुस पिरु परोल यास सकाळी १0.३0 वाजता पोलिसांनी वरली मटक्याचे साहित्य व १४६0 रुपये यासह जुगार खेळतांना पकडले तसेच मानोरा चौकात ११ वाजता आरोपी करीम चंदू कलरवाले यास मटक्याच्या चिठठया नगदी १३४0 रुपये आढळून आले तर आरोपी सागर अंबादास दयेकर यास व्हिडीओ चौकात १२.४५ वाजता वरली मटक्याच्या चिठ्ठया ११७0 रुपये आढळून आले. नमुद चारही आरोपीवर मुंबई जुगार अँक्ट १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आयपीएस असलेल्या विनीता साहू यांनी वाशिमच्या पोलीस अधीक्षक म्हणून सुत्रे स्विकारल्यापासून पोलीस विभागाने अवैध धंदे, दारू, वरली मटका आदीवर कारवाईचा सपाटा लावला आहे. यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारवाईची मोहिम कायमस्वरुपी राहावी, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे.
मंगरुळपीर तालुक्यात वरली मटक्यावर चार ठिकाणी धाड
By admin | Published: July 22, 2015 11:20 PM