मंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 08:34 PM2018-02-09T20:34:15+5:302018-02-09T20:39:21+5:30

मंगरुळपीर : येथील काँग्रेसचे नगरसेवक मिर्झा उबेद बेग यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पालीकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मदन भरगड यांनी ही कारवाई केली.

Mangarul Peer: Congress corporator Mirza Ude Beig Jahid Beag suspend from the party! | मंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी!

मंगरुळपीर : काँग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग जाहेद बेग यांची पक्षातून हकालपट्टी!

Next
ठळक मुद्दे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याचे कारण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मदन भरगड यांनी केली निलंबनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : येथील काँग्रेसचे नगरसेवक मिर्झा उबेद बेग यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पालीकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मदन भरगड यांनी ही कारवाई केली.
काँग्रेसतर्फे मिर्झा यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे की, आपण मंगरुळपीर नगर पालिकेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर निवडून आलेले सदस्य आहात.  ३०  डिसेंबर २०१७ रोजी नगर पालिकेची उपाध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली  असता या निवडणुकीत आपण भाजप उमेदवाराला मतदान करू नये अशा सूचना आपणास व्हीपद्वारे व तोंडीसुद्धा देण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भाजप उमेदवाराला मतदान केले आहे, असा अहवाल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश इंगोले व शहर अध्यक्ष जावेद सौदागर यांच्याकडून मिळाला आहे.आपली ही कृती पक्ष विरोधी व पक्ष शिस्तीचा भंग करणारी असल्याने आपल्यास काँग्रेस पक्षातून निलंबीत करण्यात येत असून आपले म्हणणे सात दिवसांच्या आत लेखी कळवावे अन्यथा आपणास काहीही सांगायचे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही आपणाविरुद्ध करण्यात येईल असे म्हटले आहे. यामूळे पालिका राजकारणात खळबळ माजली असून पक्ष विरोधी भूमिका घेतल्यास कारवाई होते हे स्पष्ट झाले आहे.
 
Web Title: Mangarul Peer: Congress corporator Mirza Ude Beig Jahid Beag suspend from the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.