लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर : राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या जागांवर पदभरती घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी व बेरोजगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदांरा निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, राज्य सेवा पदाच्या संख्येत वाढ करण्यात यावी,संयुक्त परिक्षा रद्द करुन पुर्वीप्रमाणे विविध पदांच्या स्वतंत्र्य परिक्षा घेवुन १ हजारांपेक्षा जास्त पदांची भर्ती करावी, लोकसेवा परिक्षेची बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी घ्यावी, परिक्षा केंद्रावर मोबाईल ज्ॉमर बसविण्यात यावे, राजय शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतिक्षा यादी लावावी, तलाठी पदाची जाहीरात काढुन ही पदभरती लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी, राज्य शासनाच्या व जिल्हा पातळीवरील सर्व शिक्षक भरती व इतर क वर्गातील पदे त्वरित भरावे, पोलिस भरतीमधील पदांची संख्या वाढविण्यात येवुन प्रत्येक जिल्हयात भरती घेण्यात यावी, महाराष्ट्रातील २३ हजार रिक्त शिक्षकांचे पदे भरण्यात यावे, शिक्षण सेवकाचा कालावधी ३ वर्षावरुन एक वर्षाचा करुन मानधन नऊ हजारांप्रमाणे द्यावे, कृषीसेवक पदांची भरती प्रक्रिया पारदर्शक करावी आदि मागण्या करण्यात आल्या असुन मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी व बेरोजगार युवक सहभागी झाले होत.
मंगरुळपीर : तहसील कार्यालयावर धडकला विद्यार्थ्यांचा मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:18 AM
मंगरुळपीर : राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या जागांवर पदभरती घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी व बेरोजगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदांरा निवेदन दिले.
ठळक मुद्दे राज्य शासनाने पदभरती सुरू करावी - मागणीतहसीलदारांना दिले निवेदन