लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कोरोना प्रतिबंध करिता सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पृष्ठभूमिवर पोलीस विभागाच्यावतीने शहरात पथसंचलन करण्यात आले व लॉकडाऊनचे तंतोतंत नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला असून पोलीस प्रशासनाच्यावतीने ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांची गर्दी होउ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तथापि, अनेक नागरिक अद्याप कोरोना विषाणू संसर्गाबद्दल गंभीर नसल्याने पोलीस विभागास मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागत आहे मंगरुळपीर पोलिसांनी तालुक्यात लॉक डाऊन पाळल्या जावा याकरिता अनेक उपाययोजना केल्या आहेत . विनाकारण रस्त्यावर फिरणाº्या नागरिकांवर व वाहनावर कार्यवाही करून ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे . लोकांमधील बेफिकीर वृत्ती व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर पोलिसांच्यावतीने २९ फेब्रुवारी रोजी शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले. लॉकडाउनचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारसाखळे, पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंध व लॉकडाऊन तसेच जिल्यात लागू असलेल्या संचारबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोविड प्रतिबंध कायद्याची माहिती देऊन नागरिकांनी पुढील आदेशपर्यंत लॉक डाऊन चे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले.
मंगरुळपीर पोलिसांचे शहरातून पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 4:47 PM