लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर : रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागातर्फे रॅपिड अॅन्टिजन टेस्टवर भर दिला जात आहे. दुसरीकडे प्रत्येकाची टेस्ट करू नका, रॅपिड अॅन्टिजन टेस्टनंतर आणखी तपासणी करावी, सवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करा या प्रमुख मागणीसाठी गावकऱ्यांनी २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान ठिय्या दिला तसेच २३ जुलै रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व तहसिल प्रशासनाला निवेदनही दिले.गावकऱ्यांच्या निवेदनानुसार, मांगवाडी येथे १५ जुलै रोजी तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गावातील १४ जणांना सवड येथील कोविड केअर सेंटरला क्वारंटीन करण्यात आले. सवड येथील कोविड केअर सेंटर येथे फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत असा आरोप करीत गावात बहुतांश नागरिकांच्या रॅपिड अॅन्टिजन टेस्ट केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांना सवड येथील कोविड केअर सेंटरला आणले जात असल्याने घरी चिमुकले मुलेच राहत आहेत. रॅपिड अॅन्टिजन टेस्टवर गावकºयांनी शंकाही उपस्थित केली आहे. घरातील कर्त्या पुरूषांना कोविड केअर सेंटरला नेण्यात येत असल्याने लहान मुलांचा, गुराढोरांचा, शेती कामाचा व गाव सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे गावकºयांनी निवेदनात म्हटले.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मांगवाडी येथे रॅपिड अॅन्टिजन टेस्ट आरोग्य विभागातर्फे केली जाते. या टेस्टच्या अहवालावर गावकºयांनी शंका घेणे उचित नाही. शंकांचे निरसन आरोग्य विभागातर्फे केले जाते. गावकºयांचे समाधान केले जाईल. गावकºयांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे.- अजित शेलार,तहसिलदार रिसोड
सुरक्षिततेसाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या हाय-रिस्क संपर्कातील नागरिकांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट केली जात आहे. काही जणाचंी रॅपिड टेस्ट आणि त्यानंतर स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळ येथेही पाठविले होते. या दोन्ही ठिकाणच्या अहवाल एकच आहे. नागरिकांनी शंका, कुशंका घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. - डॉ. शंकर वाघ,तालुका आरोग्य अधिकारी रिसोड