लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीप सरनाईक, जि.प.अध्यक्ष हर्षदा देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष उषाताई चौधरी, केशवराव चौधरी, महादेव सोळंके, समाधान माने, तस्लिम शेख, परशराम भोयर, अॅड. पी पी. अंभोरे, वाय. के. इंगोले, विशाल सोमटकर, दिलीप देशमुख, राजु देशमुख, मोहन इंगोले, बंडु चौधरी, दशरथ सावके, संतोष ढोबळे, पांडुरंग ढोबळे, रवी शेवळे, गजानन भालेराव, गजानन ठाकरे, पांडुरंग महाले, शिवाजी महाले, वसंता महाले, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी विद्यमान सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला. कांँग्रेस पक्षाचा आढावा घेत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. संचालन कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजुभाऊ चौधरी यांनी तर आभार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीष चौधरी यांनी मानले.
माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 4:15 PM