शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

माणिकराव ठाकरे यांची मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर /भर जहॉगीर ( वाशिम ) : लोणार जि. बुलडाणा येथील २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. मृतकाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी भर जहॉगीर, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर /भर जहॉगीर (वाशिम) : लोणार जि. बुलडाणा येथील २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. मृतकाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी भर जहॉगीर, शिरपूर येथे सांत्वनपर भेट दिली.सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या  बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना गावाजवळ लक्झरी बसची धडक बसल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये ज्ञानेश्वर वामन डोंगरे (१९), अरूण संजय कांबळे (२२),  राजू भगवान कांबळे (२३) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (२५) व गणेश सदाशीव बांगरे (३२) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले.  शनिवार, २९ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी भर जहॉगीर व शिरपूर येथे भेट देऊन मृतकाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिरपूर येथे आमदार अमित झनक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीप सरनाईक यांची उपस्थिती होती. मृतकाच्या कुटुंबियांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. मृतकाच्या वृद्ध माता, पित्यांना निराधार योजनेंतर्गत मानधन सुरू करून देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतकाच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार अमित झनक यांनी दिले. यावेळी माजी सभापती डॉ. श्याम गाभणे, माजी सरपंच गणेश भालेराव, राजू पाटील, नंदकिशोर गोरे, उपसरपंच असलम गवळी, मोहिब खॉ पठाण, मुख्तार खॉ पठाण, अमित वाघमारे, प्रशांत क्षीरसागर, स्वप्नील येवले यांच्यासह ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी माजी सभापती संजय शर्मा यांच्या मुलीच्या निधनाबद्दल माणिकराव ठाकरे, अमित झनक, दिलीप सरनाईक यांनी घरी जाऊन शर्मा यांची सांत्वनपर भेट घेतली.

टॅग्स :washimवाशिमManikrao Thakareमाणिकराव ठाकरेCongress District President Dilip Sarnaikकाँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक