वाशिम : जिल्हय़ातील दोन दिग्गज नेते माजी खासदार अनंतराव देशमुख व माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे येत्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. येथील ह्यरामगडह्णया जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या बगल्यावर ९ जुलै रोजी या दोन्ही दिग्गज नेत्यांचे मनोमिलन होऊन निवडणूकसंदर्भात रणनिती आखण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत आमने-सामने असलेले हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याची चर्चा बर्याच दिवसांपासून राजकीय वतरुळात चर्चिल्या जात होती. लोकमतने २८ जून रोजी यासंदर्भात राजकीय पानावर लिखानसुद्धा केले होते. यासंदर्भात अनंतराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांंची इच्छा व आग्रह पाहता आमची सकारात्मक बैठक पार पडली. दोघे मिळून एकत्र झालो असल्याची पुष्टी दिली. तर चंद्रकांत ठाकरे यांनीसुद्धा याला दुजोरा दिला. ९ जुलै रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या बंगल्यावर झालेल्या सभेमध्ये अनंतराव देशमुख व सुभाषराव ठाकरे, राजू चौधरी, चंद्रकांत ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांंच्या समक्ष बैठक होऊन दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले. यावेळी जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ५0-५0 टक्के जागा वाटपाचे धोरण ठरविण्यात आले आहे. सोबतच मित्र पक्ष घेतल्या जाईल व मित्र पक्षाला जागा वाटप कसे करायचे, यावर मात्र निर्णय वेळेवर घेण्यात येणार असल्याचे ठरले. या दोन दिग्गज नेत्यांना एकत्र आणण्याची किमया सूर्यप्रकाश दहात्रे यांनी पार पाडली. जिल्हय़ातील दिग्गज समजल्या जाणार्या अनंतराव देशमुख व सुभाषराव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वतरुळात चांगलीच खळबळ माजली आहे. हे दोघेही नेते आता काय रणनिती आखतात, याबाबत आतापासूनच चर्चेला जोर आला आहे.
दोन राजकीय दिग्गजांचे मनोमिलन
By admin | Published: July 10, 2015 1:22 AM