शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मानोरा: गरीबांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:29 PM

मानोरा: गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर राहत असलेल्या गरीब कुटूंबांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी मानोरा नगर पंचायतच्या सहा नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मानोराच्या तहसीलदारांकडे ३१ जानेवारीला निवेदन सादर करून या गरीबांच्या नावे घरांचे पट्टे करण्याची मागणी केली आहे. मानोरा येथे विविध शासकीय जागेवर अनेक ...

ठळक मुद्देमानोरा येथे विविध शासकीय जागेवर अनेक लोक घर बांधून आपल्या कुटुंबासह  राहत आहेत. परंतु अद्यापही त्यांना घराचे कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत.त्यामुळे त्यांना घराच्या बांधकामासाठी क र्ज मिळत नाही, तसेच शासनाच्या घरकूल योजनेचाही लाभ मिळू शकत नाही.

मानोरा: गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर राहत असलेल्या गरीब कुटूंबांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी मानोरा नगर पंचायतच्या सहा नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मानोराच्या तहसीलदारांकडे ३१ जानेवारीला निवेदन सादर करून या गरीबांच्या नावे घरांचे पट्टे करण्याची मागणी केली आहे. 

मानोरा येथे विविध शासकीय जागेवर अनेक लोक घर बांधून आपल्या कुटुंबासह  राहत आहेत. हे लोक नियमितपणे नगर पंचायतकडे वार्षिक कराचा भरणाही करतात. शासन निर्णयानुसार या लोकांच्या नावे त्यांच्या घराचे पट्टे होणे आवश्यक आहे; परंतु अद्यापही त्यांना घराचे कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना घराच्या बांधकामासाठी क र्ज मिळत नाही, तसेच शासनाच्या घरकूल योजनेचाही लाभ मिळू शकत नाही. ही बाब लक्षात घेत मानोरा नगरपंचायतमधील बांधकाम समिती सभापती ऐफाजशहा मेहमूदशहा, यांच्यासह अहेमदबेग चाँदबेग, शेख वहिद शेख अय्युब, मंजुषा महेश निशाणे , ज्ञानेश्वर गोतकर, सुनिता संतोष भगत या नगरसेवकांनी मानोराचे तहसलीदार डॉ. सुनील राठोड यांच्याकडे ३१ जानेवारीला निवेदन सादर करून शहरातील अतिक्रमणधारक कुटूंबांच्या नावे घराचे पट्ट करावे, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :washimवाशिम