लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव नगरपंचायत ३१ मे पर्यंंत आणि मानोरा नगरपंचायत १५ जूनपर्यंंंत हगणदरीमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करून कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या होत्या. मात्र, १६ जूनपर्यंंतही दोन्ही नगरपंचायतींनी हगणदरीमुक्त झाल्याचे जाहीर केलेले नाही. राज्यस्तरीय तपासणी समितीने यापूर्वी वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषद क्षेत्र हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले. मात्र, मानोरा आणि मालेगाव नगर पंचायत क्षेत्रात आजही उघड्यावर हगणदरीचा प्रकार सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मानोरा, मालेगाव हगणदरीमुक्तीपासून दूरच!
By admin | Published: June 18, 2017 1:53 AM