लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: तालुक्यातील रतनवाडी शेतशिवारात ई क्लास जमिनीवर सुरू असलेल्या हातभट्टीवर मानोरा पोलिसांनी १२ जुलै रोजी छापा मारला. तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.रतनवाडी शेतशिवारात ई- क्लास जमिनीवर हातभट्ट्या चालु असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने, बिट जमादार शिवा राठोड, इरतकर, बालक, आकाश बाभुळकर यांनी टाकलेल्या धाडीत रतनवाडी येथील आरोपी बाळु ऊर्फ शंकर गुणाजी सोनटक्के यांच्या जवळून २० लिटर गावठी दारु आणि २०० लिटर सडवा माल, मुन्ना वाघजी शिकारे यांच्याजवळून १५ लिटर दारु, शंभर लिटर सडवा माल व नागोराव शालीकराम झडके १० लिटर दारु , पाचशे लिटर सडवा असा माल पोलिसांनी जप्त केला.
मानोरा पोलिसांची हातभट्टीवर धाड!
By admin | Published: July 13, 2017 1:43 AM