शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मानोरा पंचायत समितीच्या मासिक सभेत गदारोळ!

By admin | Published: May 19, 2017 9:19 PM

मानोरा : पंचायत समितीची मासिक सभा सुरू असतानाच पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी तेथे येऊन नाहक वाद घातला. यासह कागदपत्रे, टेबल-खुर्च्या आदींची फेकफाक केली.

ऑनलाइन लोकमतमानोरा : स्थानिक पंचायत समितीची मासिक सभा १९ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असतानाच पृथ्वीराज उल्हास राठोड (वय ४० वर्षे) यांनी तेथे येऊन नाहक वाद घातला. यासह कागदपत्रे, टेबल-खुर्च्या आदींची फेकफाक केली. अशा आशयाच्या पंचायत समिती सदस्य सुनील राठोड आणि गटविकास अधिकारी गुलाब राठोड यांच्या स्वतंत्ररित्या दाखल तक्रारींवरून आरोपी पृथ्वीराज राठोड यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.मानोरा पंचायत समिती सदस्य सुनील राठोड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की पंचायत समितीची मासिक सभा असल्याने १९ मे रोजी पंचायत समिती कार्यालयात सदस्यांसह गटविकास अधिकारी राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी बेबीनंदा डेरे व शिक्षण विभागातील इतर कर्मचारी हजर असताना तेथे पृथ्वीराज राठोड याने येवून ह्यतू माझ्याविरूद्ध घेतलेला ठराव रद्द करह्ण, असे म्हणत शिविगाळ केली, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पृथ्वीराज राठोड यांच्याविरूद्ध कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.यासह मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुलाब राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आस्थापना विभागात पं.स.सदस्य सुनील राठोड यांच्यासोबत बसलेलो असताना पृथ्वीराज राठोड याने कुठलेच कारण नसताना तेथे येवून शिविगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कागदपत्रे, टेबल-खुर्च्यांची फेकफाक करून कामात व्यत्यय निर्माण केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी पृथ्वीराज राठोड यांच्याविरूद्ध पुन्हा कलम १८६ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही घटनांचा पुढील तपास बीट जमादार सुभाष महाजन, संदिप बरडे करित आहेत.