वाशिम -येथील आगारातील नादुरुस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी यापुढे विभागीय कार्यशाळेतून साहित्यासह मनुष्यबळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशीक व्यवस्थापक पठारे यांनी १३ जुलै रोजी आगाराच्या भेट दरम्यान दिले. आगार प्रमुख एन.डी.चव्हाण यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे. दै. लोकमतने रविवारी १२ जुलै रोजी वाशिम आगारातील १२ बसगाडया नादुरुस्त या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेवून प्रादेशीक व्यवस्थापक पठारे यांच्या पथकाने वाशिम आगाराला १३ जुलै रोजी तातडीची भेट देवून येथील समस्या जाणून घेतल्याचे चव्हाण यांनी लोकमतशी बोलता सांगितले. दरम्यान आगातील बसगाड्यांची नियमित सव्हीर्संंंगही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगारातील १२ बसगाडया नादुरुस्त होवून डेपोत जमा झाल्यामुळे चंद्रपूर, औंरगाबाद, नागपूर आदी लांब पल्याच्या फेर्या बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे. याशिवाय आगारातील अन्य असुविधां व भोंगळ कारभार लोकमतने चव्हाटयावर आणल्यामुळे प्रादेशीक व्यवस् थापक एम. बी. पठारे यांनी विभाग नियंत्रक अजय सोली, (अकोला) व सहाय्यक यंत्र अभियंता जोशी अकोला यांच्या समवेत वाशिम येथे आगारात भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी पठारे यांनी आगारात रिक्त असलेल्या यांत्रीक कर्मचार्यांच्या जागी नविन कर्मचार्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येवून २२ यांत्रिक कर्मचार्यांना पदोन्नती देवून त्याची कुशल कामगार म्हणून नेमणुक करणार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच नादुरुस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी विभागीय कार्यशाळेतून मनुष्यबळ व साहित्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ही चव्हाण यांनी बोलताना दिली. त्यामुळे वाशिम आगाराच्या समस्या निकाली निघून येथील सुविधांचा दर्जा वाढणार आहे. परिणामी आता प्रवाशांना चांगल्या बसद्वारे प्रवास करण्यास मिळेल.
बसेस दुरुस्तीसाठी विभागीय कार्यशाळेतून मनुष्यबळ
By admin | Published: July 15, 2015 1:41 AM