भजन-किर्तनाने गाजले आंदोलन : आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलनाची धग कायमचलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी अन्य स्वरूपातील आंदोलनांसह ४ आॅगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यात ७ आॅगस्ट रोजी समाजातील वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी भजन-किर्तनाच्या माध्यमातूनही आरक्षणाच्या मागणीची आरोळी ठोकण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्वरूपातील आंदोलने केली जात आहेत. त्याची धग अद्याप कायम असून शासनस्तरावरून या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने ९ आॅगस्टला ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. याच मुद्यावर वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ आॅगस्टपासून ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. त्यात दैनंदिन समाजबांधवांचा सहभाग वाढत असून ७ आॅगस्ट रोजी समाजातील वकिलांनी ठिय्या देवून आम्हीही सोबत असल्याचे जाहीर केले. यादरम्यान लोककलावंतांनी गीतगायनाच्या माध्यमातून आंदोलनात वेगळीच रंगत आणल्याचे दिसून आले.
Maratha Reservation: मराठा समाजातील वकिलांचा ठिय्या आंदोलनात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:38 PM
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी अन्य स्वरूपातील आंदोलनांसह ४ आॅगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
ठळक मुद्दे७ आॅगस्ट रोजी समाजातील वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी भजन-किर्तनाच्या माध्यमातूनही आरक्षणाच्या मागणीची आरोळी ठोकण्यात आली.