ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. मंगळवारी मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथे आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन करून तथा रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. वाशिम- मेहकर मार्गावर मंगळवारी सकाळपासून आंदोलन सुरू केल्याने महामार्गावरिल वाहतुक बराच वेळ ठप्प झाली होती. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका केली. आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.