रिसोड : मराठा आरक्षणासाठीरिसोड येथे शनिवार ४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी आंदोलनात मराठा व सर्व समाजाच्या बांधवानी सहभागी होत. शासनाने मराठयांना त्वरीत आरक्षण लागु करण्याची मागणी केलीआहे.राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असुन रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित जेलभरो आंदोलनात जिल्हाभरातील इतर समाजाने पाठींबा देऊन सहभागी होत त्वरित मराठा आरक्षणाची मागणी करत सरकारप्रति रोष व्यक्त केला. शनिवारी सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान शहरातील लोणी फाटयावर मराठा समाजातील सर्व पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. सोबतच मुस्लिम, बौद्ध,माळी, कासार,मातंग, चांभार सहित सर्व समाजाने या मोर्चात सहभागी होऊन मराठा आरक्षणाची मागणी केली. यावेळी लोणी रोडवर काही काळ चक्काजाम करण्यात आला.यावेळी हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला.रिसोड मध्ये झालेल्या या जेलभरो व चक्काजाम आंदोलनात सर्व धर्म व समाजाच्या नागरिक, युवक यांनी मराठा समाजास त्वरित आरक्षण देण्यात यावे अशी मागनी केली दरम्यान संपूर्ण आंदोलनादरम्यान पाऊस सुरू होता परंतु आंदोलकांवर याचा काही परिणाम झाला नाही. ये जा करणाऱ्या मराठा व इतर समाजाच्या बांधवानी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन लढ्यात उडी घेतली. कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणास हात न लावता ज्या राज्यात ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी मराठा समाजाच्या व सहभागी झालेल्या इतर समाजाच्या आंदोलकांना रिसोड पोलीसानी पोलीस व्हॅनद्वारे जेलभरो करण्यात आले.
Maratha Reservation Protest: रिसोडमध्ये मराठयांचे 'जेलभरो' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 2:52 PM
रिसोड : मराठा आरक्षणासाठी रिसोड येथे शनिवार ४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केले.
ठळक मुद्देहरातील लोणी फाटयावर मराठा समाजातील सर्व पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.मुस्लिम, बौद्ध,माळी, कासार,मातंग, चांभार सहित सर्व समाजाने या मोर्चात सहभागी होऊन मराठा आरक्षणाची मागणी केली.आंदोलकांना रिसोड पोलीसानी पोलीस व्हॅनद्वारे जेलभरो करण्यात आले.