लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांतर्फे वाशिम जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनाची धग कमी-अधिक प्रमाणात ३० जुलै रोजीदेखील कायम होती.रिसोडते मालेगाव या मार्गावरील देगााव फाटा येथे ३० जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ठोस हालचाली दिसत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली आहे. वाशिम जिल्ह्यातदेखील २४ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात आंदोलन केले जात आहे. तातडीने मराठा आरक्षण द्यावे, आरक्षणासाठी प्राणास मुकलेल्या तरुणास शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ३० जुलै रोजी रिसोड ते मालेगाव या मार्गावरील देगाव फाटा येथे दुपारी १२ वाजतादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे रिसोड ते मालेगाव या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वृत्त आहे. रिसोड पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
Maratha Reservation : रिसोड ते मालेगाव मार्गावरील देगाव येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 2:12 PM
. रिसोड ते मालेगाव या मार्गावरील देगााव फाटा येथे ३० जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देरिसोड ते मालेगाव या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. रिसोड पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.