शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मराठा सेवा संघाची कार्यशाळा उत्साहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:23 AM

वाशिम : स्थानिक केमीस्ट भवन येथे  ३ सप्टेंबरला मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. 

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चापदाधिकार्‍यांच्या कार्यशाळेचा दुसरा टप्पा लवकरच!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक केमीस्ट भवन येथे  ३ सप्टेंबरला मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे मार्गदर्शक तथा सुलभक म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले तर उदघाटक म्हणून जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे हे होते. यावेळी व्यक्तीमत्व विकास, सृजणत्व निर्मिती,  मानवी जीवनाचे मूल्य व चिंतन, देहबोलीचा वापर, सकारात्मकता वाढवणे, बुद्धीप्रामाण्याला प्रमाण मानणे, वैज्ञानिक दृष्टीकोन, यासोबतच चळवळीची गरज, स्थापना, इतिहास, सद्यस्थिती, पदाधिकार्‍यांत अपेक्षीत व झालेले बदल, समाजासमोर मांडण्याची शैली, जिजाऊ सृष्टी, प्रगती व समाजाकडून अपेक्षा, महामानवांचे विचार व आत्मसात तथा आचरणाची आवश्यकता, समाजातील विविध समस्या व पदाधिकार्‍यांचा अभ्यास तथा अलिप्ततेचा परिणाम व अन्य विषयांवर  चर्चा करण्यात आली. समाजात वावरतांना एकांगी भूमिका न मांडता पूर्ण अभ्यास करूनच पदाधिकार्‍यांनी ती मांडली पाहिजे असे विचार या कार्यशाळेत मांडण्यात आले. कुणाचाही द्वेष न करता सर्वांगीन  प्रगतीची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांच्या कार्यशाळेचा दुसरा टप्पा लवकरच घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. कार्यशाळेत जिल्हाध्यक्ष प्रा. भरत आव्हाळे, सचिव नारायणराव काळबांडे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा प्रा. सविता मोरे, जिल्हाध्यक्षा संजीवनी बाजड, वैशाली बुंधे, सुरेखा आरू, वर्षा भगत, गोपालराव गावंडे, अनिल वाघ, अरुण झुंगरे,प्रभाकर लहाने, विकास नवघरे, अनिल मोरे, विजय बोरकर, दत्ता पोफळे,संजय पडोळे, डिगांबर सरकटे, धनंजयराव देशमुख, भागवत बुंधे, भागवत मापारी, नारायण शिंदे, विकास नवघरे, आदी पदाधिकारी व दिलीप शिंदे, कैलास मुठाळ, मनोज भोयर, शिवाजी कव्हर, गजानन वाझुळकर यांनी चर्चेत सहभाग नोंदवला.