उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशाने १४ ते १८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्याच्या सूचना आहे. त्यानुसार १६ जानेवारी रोजी कारंजा येथील दिवाणी न्यायालयात न्यायदंडाधिकारी आर.एम. शेख यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमाला दुसरे न्यायदंडाधिकारी आर.आर. पांडे तर प्रमुख वक्ते म्हणून परमेश्वर व्यवहारे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यवहारे यांनी भाषा म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतीक असून भाषा केवळ आपल्या व्यवहाराचे संवादाचे माध्यम नाही तर हे आपली संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचे प्रतीक ठरते, असे उद्गार काढले. या कार्यक्राला सहायक अधीक्षक जी.बी. नांदेकर, वि.वा. बेलखेडकर, ए.व्ही. वर यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन मोना पाठे यांनी केले. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:19 AM